मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर आधीच भार आला आहे. त्यात आता आणखी धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कारण कोरोनामधून बरे झालेले रुग्ण पुन्हा रुग्णालयात भरती होण्याचा प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये फुफुसाचे आजार वाढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना गंभीर स्वरुपाची कोरोनाची लागण झाली होती आणि जे रुग्ण 15 ते 17 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल होते, अशा रुग्णांमध्ये फूफसांचे आजार उद्धभवत आहेत.
केईएम हॉस्पिटलचे माजी डीन आणि राज्य सरकार कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, "सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत घट होत आहे. तरीही कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये दुसऱ्या आजारांची लक्षणे समोर येत आहेत. जी एक चिंतेची बाब आहे."
डॉ. अविनाश सुपे यांनी एका घटने बद्दल सांगितले की, तेलांगनामधील एक 76 वर्षाचे वृद्ध 15 दिवस रुग्णालयात भरती होते. ते बरे झाल्यानंतर आपल्या घरी परते, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रासू होऊ लागल्याने त्यांना स्थानिय रुग्णालयात ICUमध्ये ठेवण्यात आले. परंतु काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या फूफूसाला सूज आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना गंभीर स्वरुपाची कोरोनाची लागण झाली आहे. असे रुग्ण बऱ्याचदा शरीरीक दृष्ट्या कमजोर आसतात, त्यामुळे अशा लोकांना बरे झाल्यानंतरही काही महिने ऑक्सिजन ची गरज भासते. मे महिन्यात मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात कोव्हिड होऊन गेले जवळ-जवळ 170 नवीन रुग्ण दिसले. फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू म्हणाल्या, 'सार्स-कोव्ह -2' विषाणू शरीरात विविध रुपांना संक्रमित करण्यास सक्षम आहे. हा व्हेरिअंट लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी प्रभावीत करण्यास सुरवात करतो."
डॉ. अनिता मॅथ्यू म्हणतात की, पोस्ट कोव्हिड रुग्णालयात येणाऱ्या 100 रुग्णांपैकी कमीत कमी 70 लोकांमध्ये कोव्हिडचे परिणाम पाहिले गेले आहेत. त्यांपैकी 20 % रुग्णांना गंभार स्वरुपाची लक्षणे आढळतात. ज्यांच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे.