कोर्ट मॅरेज करायला गेला आणि खाल्ला चपलांचा मार

 मध्यप्रदेशच्या सतनामध्ये तेव्हा विचित्र परिस्थिती तयार झाली, जेव्हा नवविवाहीत जोडपं आपल्या प्रेमिकेसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी न्यायालय परिसरात पोहोचले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 11, 2018, 09:43 PM IST
कोर्ट मॅरेज करायला गेला आणि खाल्ला चपलांचा मार title=

सतना : मध्यप्रदेशच्या सतनामध्ये तेव्हा विचित्र परिस्थिती तयार झाली, जेव्हा नवविवाहीत जोडपं आपल्या प्रेमिकेसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी न्यायालय परिसरात पोहोचले. मात्र या गोष्टीची सूचना मुलीच्या नातेवाईकांना मिळाली, आणि त्यांनी संधी साधली. मुलगाही मुलीला घेऊन न्यायालयात कोर्ट मॅरेजसाठी पोहोचला.

मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाला मार

पण मुलीच्या नातेवाईकांनी त्याला चपलेने मारहाण केली, मुलाला चांगलाच मार मुलीच्या नातेवाईकांनी दिल्या, वर शिव्याही दिल्या. कोर्टात हे दृश्य पाहून कुणालाही कळत नव्हतं काय करावं. मात्र मुलीचे नातेवाईक मुलाला मारहाण करण्याची शुटिंग मोबाईलमध्ये टीपत होते.

पळून जावून लग्नाचा प्रयत्न

संबंधित मुलगा आणि मुलगी हे घरून पळून आले होते, कारण त्यांना प्रेमविवाह करायचा होता, मात्र ते कोर्टात नातेवाईकांच्या फेऱ्यात सापडल्याने, मुलाला मात्र मार खावा लागला.