नवी दिल्ली : देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या काही दिवसात रुपे आणि भीम अॅप द्वारे होणाऱ्या पैशाच्या देवाण घेवाणीवर ग्राहकांना कॅशबॅक देण्यात येणार आहे. आज दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली.
सप्टेंबर महिन्यात गोव्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या अंतर्गत ग्राहकांने वस्तू किंवा सेवेसाठी रुपे कार्ड किंवा भीम अॅपच्या माध्यमातून पैसे दिले तर ग्राहकांना त्या वस्तू किंवा सेवा करातून २० टक्के कॅश बॅक मिळणार आहेत. याविषयीच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर लगेच ही योजना लागू करण्यात येईल.