Cotton Corporation Bharti: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना चांगल्या नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन येत असतो. येथे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरीची माहिती मिळू शकते. अशीच एक बंपर भरती समोर आली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यासाठी तुमच्या पदानुसार 22 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
असिस्टंट मॅनेजर (Legal)चे 1 पद भरले जाणार असून यासाठी उमेदवारांकडे 50% गुणांसह लॉची डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी अनुभवानुसार 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. असिस्टंट मॅनेजरचे 1 पद भरले जाणार असून उमेदवाराकडे 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी असावी. या पदासाठी अनुभवानुसार 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनीची11 पदे भरली जाणार असून उमेदवाराकडे एमबीए असणे आवश्यक आहे. या पदासाठी अनुभवानुसार 30 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिवची 120 पदे भरली जाणार असून यासाठी 50% गुणांसह बीएससी करणे आवश्यक आहे. या पदासाठी अनुभवानुसार 22 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ज्युनियर असिस्टंटची 20 पदे भरली जाणार असून उमेदवारांना बीएससीमध्ये 50% गुण असावेत. या पदासाठी अनुभवानुसार 22 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्सची 40 पदे भरण्यात येणार असून उमेदवारांना बीकॉममध्ये 50% गुण असावेत. या पदासाठी अनुभवानुसार 22 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच ज्युनियर असिस्टंट (हिंदी ट्रान्सलेटर) चे 1 पद भरले जाणार असून उमेदवाराकडे इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी असावी. या पदासाठी अनुभवानुसार 22 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी, 18 ते 32 वर्षे असावे. एससी/एसटी उमेदवारांना यात 5 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 1500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन यांच्याकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. 2 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.