नवी दिल्ली : ई कॉमर्स वेबसाईट असलेली स्नॅपडीलने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही महिन्यांमध्ये स्नॅपडीलमध्ये कॉस्ट कटिंग केली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या १२००वरुन ही संख्या ६०० पर्यंत घटवली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिलीये.
कंपनीने आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टसोबत न जाता स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील दोन ते तीन महिन्यांत स्नॅपडील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करणार असल्याची माहिती सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीये.