कोरोना व्हायरसमुळे शाहीनबागमध्ये शुकशुकाट

कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव

Updated: Mar 23, 2020, 12:06 PM IST
कोरोना व्हायरसमुळे शाहीनबागमध्ये शुकशुकाट  title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातल आहे. देशभरात आतापर्यंत आठ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच शाहीन बागमध्ये आंदोलन करण्याऱ्या महिला या कोरोना व्हायरसला घाबरल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. 

नागरिकता कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ शाहीनबागमध्ये या महिला आंदोलन करत होत्या. पण आता कोरोनाच्या दहशतीमुळे या महिला आंदोलन सोडून गेल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन कार्यकर्त्यांच्या संख्येत घट पाहायला मिळत असे. शाहीन बागेत ज्या मंडपात महिला आंदोलन करत होत्या त्या मंडपात आता चक्क शुकशुकाट पाहायला मिळत आहे. 

देशात कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. देशातील दहापेक्षा जास्त राज्यात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असूनही, लोक सतत घराबाहेर पडत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अजूनही बरेच लोक लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. मी राज्य सरकारांना विनंती करतो की त्यांनी नियम व कायद्यांचं पालन करण्यासाठी सांगावं.'

एवढंच नव्हे तर कोरोनाचा परिणाम हा आर्थिक व्यवहारांवर देखील झाला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना शेअर बाजारावर देखील याचा परिणाम दिसत आहे. सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेंसेक्स २३०७ अंकांनी पडलं. शेअर बाजार आज २७६०८ अंकावर उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जवळपास ८०० अंकांनी घसरला. स्टॉक एक्सचेंज ७९४५ अंकावर उघडला.