मुंबई : भारतात कोरोनाव्हायरसमुळे (Cornavirus in India) परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. बुधवारी, देशभरात भारतात 1.85 लाख नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर 1025 जणांचा मृत्यू झाला. तसेच यापूर्वी मंगळवारी (13 एप्रिल) 1.61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. (Massive spike of 1.85 lakh new COVID-19 cases take India's total count to 1.38 crore)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात 1 लाख 85 हजार 248 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर या काळात 1025 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 38 लाख 70 हजार 731 वर गेली आहे आणि 1 लाख 72 हजार 114 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एका दिवसात देशात कोविड -19 संसर्गाच्या नवीन घटनांपैकी 80.8 टक्के रुग्ण 10 राज्यांमधील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळमध्ये दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेत.
मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus in Maharashtra) 60,212 नवीन रुग्ण आढळले आणि 281 जणांचा मृत्यू झाला. परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग म्हणाले की, राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 3519208 पर्यंत वाढली आहे, तर एकूण 58,526 लोकांचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी बरे झालेल्या 31624 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. यासह, या आजारापासून एकूण 2866097 रुग्ण बरे झाले आहेत आणि कोविड-19 च्या 593042 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 13468 नवीन घटनांमध्ये आल्यानंतर आणि संसर्गामुळे 81 लोकांचा मृत्यू झाल्याने साथीच्या आजारामुळे हे देशातील सर्वाधिक प्रभावित शहर बनले आहे. आतापर्यंत मुंबईत दररोज 9986 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल बंगलोरमध्ये 8787 , चेन्नईमध्ये 2105 आणि कोलकातामध्ये 1271 क्रमांकावर आहे.