Corona Virus | कोरोनाच्या संसर्गाने २ आयएएस अधिकाऱ्यांचाही मृत्यू

कोरोना आता अधिकाऱ्यांच्या जीवावरही उठला आहे. अर्थातच आयएएस अधिकाऱ्यांना आरोग्य सेवा मिळण्यास कोणतीही कमतरता नसते, तरी देखील 

Updated: Apr 14, 2021, 10:24 AM IST
Corona Virus | कोरोनाच्या संसर्गाने २ आयएएस अधिकाऱ्यांचाही मृत्यू title=

पाटणा : कोरोना आता अधिकाऱ्यांच्या जीवावरही उठला आहे. अर्थातच आयएएस अधिकाऱ्यांना आरोग्य सेवा मिळण्यास कोणतीही कमतरता नसते, तरी देखील कोरोनाने २ आयएएस अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. कोरोनाने झाडावरची पानं गळावती तशी माणसं जग सोडून जात असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातजाऊ  लॉकडाऊनला विरोध होत असला, तरी इतर राज्यातील स्थिती देखील नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते असे संकेत मिळतायत. बिहारमध्ये तर २ आएएएस अधिकाऱ्यांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक असल्याचं दिसून येत आहे, कोरोनाने सुरु केलेलं हे मृत्यूचं तांडव अजूनही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. 

बिहारमध्ये आएएस विजय रंजन यांचं मंगळवारी कोरोनाने निधन झालं, विजय रंजन यांना ४ दिवसापूर्वी पाटणाच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ते पंचायत राज विभागाच्या निर्देशकपदी कार्यरत होते. 

वैशाली जिल्ह्याचे प्रतिरक्षण अधिकारी डॉ.ललन कुमार राय यांचं देखील कोरोनाने निधन झालं आहे. यात आएएस विजय रंजन यांचं वय ५९ तर डॉ.ललन कुमार राय याचं वय ६० वर्षाच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

बिहारमध्ये मंगळवारी एका दिवसात कोरोना संक्रमणाच्या ४ हजार १५७ केसेस समोर आल्या आहेत. बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनी सरकारी हॉस्पिटल्सचे दौर करुन आरोग्य सेवेची माहिती घेतली आहे.