मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरसने फक्त मनुष्याच्या आरोग्यावरच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण जीवनावरच परिणाम केला आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा सर्वच स्तरांवर आव्हानांचा डोंगर उभा करणारा हाच कोरोना विषाणू आला अनेकांच्या नोकऱ्याही हिरावण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्याचा फटका सध्याच्या घडीला कॅब (टॅक्सी) सेवा पुरवणाऱ्या OLA या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार असल्याची चिन्हं आहेत.
OLA चे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. त्यांचं पत्रक पाहता, या कंपनीच्या सेवेत असणाऱ्या जवळपास १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्वभावाचा थेट परिणाम OLA च्या कमाईवर आणि एकंदरच आर्थिक गणितावरही झाला आहे.
'मागील दोन महिन्यांमध्ये आपल्या कंपनीच्या नफ्याचा दर हा थेट ९५ टक्क्यांनी खाली आला आहे. मुख्य म्हणजे भारतासह संपूर्ण जगातच या संकटानं कोट्यवधी लोकांचं आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य पुरतं बदललं आहे', असं अग्रवाल म्हणाले. OLAवर दिसून येणारे याचे परिणा हे प्रदीर्घ काळासाठी असतील याचे संकेतही त्यांनी दिले.
'कोरोनापूर्वीचा काळ इतक्या सहज परत येईल अशी काही चिन्ंहं नाहीत. सोशल डिस्टन्सिंग, चिंतातूरपणा, अस्वस्थता आणि अती काळजी हे अनेकांच्याच जगण्याचे निकष झालेले असतील', असंही त्यांनी लिहिलं.
कामावरुन नाईलाजास्तव कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार आणि नोटी पिरियड काळातील पगारही देण्यात येणार असून, या काळात कंपनी संशोधन आणि विकासाच्या घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
वाचा : तब्बल ६० दिवसांनी सलमान आई- वडिलांच्या भेटीला
UBER मागोमाग OLAही...
UBER कडून आर्थिक संकटाच्या या काळात जवळपास ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्यानंतर अवघ्या काही काळानेचट OLA मधील कर्मचारी कपातीचं वृत्त समोर आलं. इतकंच नव्हे, तर झोमॅटो, स्विगी यांच्याकडूनही या संकटसमयी कर्मचारी कपात केली गेल्याची माहिती आहे.