22 देशांमध्ये कोरोनाचा कहर, खतरनाक व्हेरिएंट भारतात पोहोचला; वेगळीच लक्षणे समोर

Covid-19 Surge in India: कोरोनाचा धोका संपलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 22 देशांमध्ये या कहर पाहायला मिळत आहे. आता एकदम धोकादायक व्हेरिएंट भारतात पोहोचला आहे. याची लक्षणे वेगळीच असल्याचे समोर आले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2023, 12:32 PM IST
22 देशांमध्ये कोरोनाचा कहर, खतरनाक व्हेरिएंट भारतात पोहोचला; वेगळीच लक्षणे समोर title=

Covid 19 Cases in India : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक राज्यांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र भारतासाठी एक चिंतेची बाब आहे. कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे. त्याचा प्रादुर्भाव होत आहे. या व्हेरिएंट नाव आर्क्टुरस (Arcturus) आहे. हा प्रकार क्रॅकेन प्रकारापेक्षा 1.2 पट वेगाने पसरतो. त्यामुळे त्याचा धोका वाढला आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. प्रत्येक दिवसागणिक आकड्यांत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 10 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आश्चर्याचीबाबत म्हणजे 6 एप्रिल रोजी 5335 कोरोना रुग्ण आढळले. म्हणजे अवघ्या 7 दिवसात कोरोना रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मास्कची सक्ती करण्यात आली आहे.  

आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता आर्कटुरस हा व्हेरिएंट दाखल झाल्याने चिंता व्यक्त होत आह. हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचे सांगितले जात आहे.  Omicron च्या 600 पेक्षा जास्त उप-व्हेरिएंटचा एक भाग आहे. वास्तविक Omicron च्या XBB.1.16 उप-व्हेरिएंटचे नाव आर्कटुरस आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांव्यतिरिक्त 22 देशांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या प्रकाराने या देशांमध्ये कहर निर्माण केला आहे. भारतात या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.  गेल्या एका महिन्यात या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये 13 पटीने वाढ झाली आहे. हा नवा व्हेरिएंट चिंता वाढवणार आहे, असे WHO ने म्हटले आहे.

Arcturus ची ही आहेत लक्षणे

भारतात पोहोचलेला Arcturus हा नवा व्हेरिएंट धोकादायक आहे. 
WHOच्या मते, या व्हेरिएंटची मुलांमध्ये दिसणारी लक्षणे इतर कोणत्याही प्रकारात दिसलेली नाहीत. जरी जास्त ताप, डोळ्यांना खाज आणि चिकटपणा जाणवणे, डोळे गुलाबी होणे आणि खोकला ही त्याची लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची बदललेली लक्षणे आहेत की नाही, हे सांगणे घाईचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे  आहे. मात्र, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात आग जाणवते. हा एक डोळ्यांचा आजार आहे. तो डोळ्यांच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटचे नवीन लक्षण म्हणून उल्लेख केला जात आहे.

काय आहेत यावर उपचार?

कोरोनाची ही लक्षणे कोणामध्ये दिसली तर प्रथम स्वतःला क्वारंटाईन करा. कोरोना चाचणी करुन घ्या. मात्र, बदलत्या हंगामामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याची लक्षणेही कोरोनासारखीच आहेत. त्यामुळे लगेच घाबरु नका. ताप आला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा, सतत साबणाने हात धुवा, मास्क घाला आणि सोशल डिस्टंट ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.