कोरोनाचे संकट : लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.  

Updated: Mar 21, 2020, 05:40 PM IST
कोरोनाचे संकट : लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (coronavirus)वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (  Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी घरीच राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी दिल्लीत ५० टक्के बस धावणार आहे. दिल्लीकरांनी घरीच रहावे, बाहेर जाऊ नये. तसेच ७२ लाख लोकांना ७.५ किलो धान्य मिळेल, अशी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीत रेशनचा कोटा वाढविला आहे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ७२ लाख लोकांना दरमहा ७.५ किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. रात्रीच्या निवारामध्ये मोफत भोजन दिले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेशन दुकानांवर गर्दी करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

 सध्या दिल्लीत बंदची कोणतही परिस्थिती नाही, परंतु गरज पडल्यास आम्ही दिल्लीमध्ये लॉकडाउन करु शकतो, असा इशारा दिला आहे. या व्यतिरिक्त दिल्लीतील वृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन दुप्पट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. ज्येष्ठांनी घरे सोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असेही ते म्हणाले.