चार महिन्यांनंतर दिल्लीत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण

फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.  

Updated: Dec 26, 2020, 07:57 AM IST
चार महिन्यांनंतर दिल्लीत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण title=

नवी दिल्ली : फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामध्ये आता नव्या कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या ४ महिन्यांनंतर दिल्लीत कोरोनाचे सर्वात कमी रूग्ण आढळले आहे. दिल्लीत नवे ७५८ रुग्ण सापडले आहेत. १६ ऑगस्टपासून एका दिवसात समोर येणाऱ्या रूग्णांच्या तुलनेत आता समोर आलेली रुग्णांची संख्या कमी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख २१ हजार ४३९वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ८५ हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  मुंबईतील धारावीमध्ये शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. 

१ एप्रिलला पहिला रूग्ण धारावीत मिळाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी धारावीतून एकही रूग्ण मिळालेला नाही. सध्या धारावीत केवळ १२ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी ८ होम क्वारंटाईन आहेत तर ४ जण सीसीसी २ मध्ये दाखल आहेत. 
 
धारावीतील आतापर्यंतची एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३७८८ असली तरी ३४६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे धारावीत नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.