देशाची राजधानी उद्यापासून 'लॉकडाऊन'

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाची राजधानी असलेली दिल्ली उद्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

Updated: Mar 22, 2020, 07:13 PM IST
देशाची राजधानी उद्यापासून 'लॉकडाऊन' title=

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाची राजधानी असलेली दिल्ली उद्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत दिल्ली बंद करण्यात येणार आहे. दिल्लीच्या सगळ्या सीमा या बंद करण्यात येणार आहेत. तसंच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद राहणार आहेत.

३१ मार्चपर्यंतच्या काळात दिल्लीतली धार्मिक स्थळंही बंद राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २७ रुग्ण आढळले आहेत.

देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३४० वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७४ रुग्ण आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातले २ जण मुंबईचे आहेत. दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि गुजरातमधल्या प्रत्येकी १-१ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्यापासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. राज्यात रेल्वे, एसटी बस तसंच खासगी बसही या कालावधीमध्ये बंद असतील. 

राज्यात या सुविधा सुरु राहणार