Corona Vaccine : वॅक्सिन घेणे का आहे गरजेचे, जाणून घ्या

कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  कोरोनापासून आपल्याला वाचायचे असेल तर कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेण्याची गरज आहे.  

Updated: Apr 23, 2021, 01:05 PM IST
Corona Vaccine : वॅक्सिन घेणे का आहे गरजेचे, जाणून घ्या title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तिसरी लाटही येऊ घातली आहे. कारण तिसऱ्या स्ट्रेनची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनापासून आपल्याला वाचायचे असेल तर कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेण्याची गरज आहे. अनेकांच्या मनात या वॅक्सिनबाबत अनेक शंका आणि प्रश्न आहे आहेत. त्यामुळे काहीजण भीतीपोटी वॅक्सिन घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु नका. ते तुमच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. वेळीच सावध व्हा आणि वॅक्सिन घेण्यास प्राधान्य द्या. आता सरकारने 18 वर्षांवरील लोकांसाठी लस घेण्यास मान्यता दिली आहे. उद्यापासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु होणार आहे. (Coronavirus in Maharashtra) 

लस घेतल्यानंतर नक्की काय होते? 

लस (Vaccine) घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही. मात्र, लस घेतल्याने कोरोना (Corona Vaccine) व्हायची शक्यता असते. मात्र, त्याची तीव्रता कमी होते. साध्या उपचारांनी कोरोना बरा होतो आणि तुम्ही लवकर बरे होऊन घरी परतू शकता. लस घेतल्यानंतर शरिरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम लस करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरुपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता उभारते, आता या अँटीबॉडीज कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते.

रेमडेसिवीर औषध घेण्याची गरज नाही !

वॅक्सिन घेतल्यानंतर त्याचा एक मोठा फायदा असा आहे की, कोरोनाबाधित रुग्ण सिरियस होण्याची शक्यता कमी असते. साध्या उपचारांनी रुग्ण बरा होऊ शकतो. तसेच जरी कोरोना झाला तरी रेमडेसिवीर औषध घेण्याची गरज भासत नाही. कारण वॅक्सिन घेतल्याने  शरीर निर्माण झालेल्या अँटीबॉडीजमुळे संरक्षण मिळते. प्रतिकारशक्ती तयार व्हायला सुरुवात झाल्याने रेमडेसिवीर औषध घेण्याची वेळ येत नाही.

दरम्यान, आपल्या देशात आधीपासून अनेक लसी देण्यात येत आहेत. काही लसी एकाचवेळी दिल्या जातात आणि त्या आयुष्यभर संरक्षण पुरवत राहतात. बाळ जन्माला येते तेव्हा त्याला सर्वसामान्यपणे बीसीजी, पोलिओचा (लस) डोस तोंडावाटे दिला जातो,  गोवर, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी या लसी दिल्या जातात. आणि आता ही नवी कोविड-19 विरोधातील लस आहे.

वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत का?

वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत का, असा एक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जरी साईडइफेक्ट असले तरी त्याची तीव्रता कमी आहे. मात्र, रेमडेसिवीरचा विचार करता हे साईडइफेक्ट कमी आहेत. साईडइफेक्टच्या भीतीपोटी लस घ्यायला टाळाटाळ करण्यात येत आहे.  वॅक्सिनपेक्षा रेमडेसिवीरचे जास्त साईडइफेक्ट आहेत. त्यामुळे वॅक्सिनला प्राधान्य द्या. अद्याप वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे नाव कोविन अॅपवर नोंदवा.

भारतात दिल्या जाणाऱ्या लसींचे दोन डोस आवश्यक असतात. या डोसेसच्या वेळांमध्ये फरक असू शकतो. दुसरा डोस किंवा बूस्टर डोस पेशी उत्पन्न करतो, दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे असते. एमआरएनए वॅक्सिन तीन ते चार आठवड्यांच्या म्हणजे 28 ते 30दिवसांच्या अंतराने देखील दिल्या जातात. या लसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे कोणतेही केस रिपोर्ट्स आलेले नाहीत.  या लसीचे साईड इफेक्ट्स इन्फल्युएंझा लसीपेक्षाही सौम्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वॅक्सिनचे तसे दुष्परिणाम नाहीत. परंतु रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप आवश्यक आहे.