ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट ? 15 डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू, फेब्रुवारीत कहर?

IITच्या संशोधकांनी हा धक्कादायक दावा केला आहे

Updated: Dec 24, 2021, 10:05 PM IST
ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट ? 15 डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू, फेब्रुवारीत कहर? title=

Omicron Update : देशात ओमायक्रॉनचे (Omicron) रूग्ण झपाट्यानं वाढत आहेत. ही रूग्णवाढ अशीच होत राहिली तर तिसरी लाट (Corona Third Wave) अटळ आहे असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी तिसऱ्या लाटेबाबाबत धक्कादायक अहवाल दिलाय. 

कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. 3 फेब्रुवारीपर्यंत ओमायक्रॉन रूग्णांची संख्या सर्वाधिक असेल.  यादरम्यान देशात दररोज किमान 1 लाख 80 हजार रूग्ण आढळू शकतात, असाही दावा या संशोधकांनी केलाय. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण आढळलेल्या टॉप 10 देशातील आकडेवारीच्या आधारे संशोधकांनी हा अंदाज वर्तवला आहे.

देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका
देशात ओमायक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्य ३५८वर गेली असून १७ राज्यात रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण ८८ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर दिल्लीत ६७, तेलंगणामध्ये ३८, तामिळनाडूत ३४, गुजरातमध्ये ३०, केरळमध्ये २७, राजस्थानमध्ये २२, हरियाणात ४, ओडिशात ४, जम्मू-काश्मिरमध्ये ३, पश्चिम बंगाल, आंध्र प्रेदश आणि उत्तर प्रदेशामध्ये  प्रत्येकी २, चंदिगड, लडाख आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

राज्य स्तरावर हालचाली
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय तसंच राज्य स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. .त्यामुळे लॉकडाऊनची झळ पोहचू नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. कारण दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता तिसरी लाट कुणालाही परवडण्याजोगी नाही.