राहुल यांच्या चिंतनाचा देशाला फायदाच, शिवसेनेकडून कौतूक

विरोधी पक्षाने कसे वागालया हवे ? याची आचारसंहीता राहुल यांनी आखून दिल्याचे सांगत त्यांच्या भुमिकेचे कौतूक

Updated: Apr 18, 2020, 10:42 AM IST
राहुल यांच्या चिंतनाचा देशाला फायदाच, शिवसेनेकडून कौतूक  title=

मुंबई : कोरोना विरुद्धच्या युद्धात राहुल गांधी याची भूमिका ही संयमी आणि जागरुक असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे. देशावर संकट ओढावले असताना विरोधी पक्षाने कसे वागालया हवे ? याची आचारसंहीता राहुल यांनी आखून दिल्याचे सांगत त्यांच्या भुमिकेचे कौतूक केले आहे.

पहिले लॉकडाऊन जाहीर करण्याआधीपासून राहुल गांधी सरकारला जागरुक करत होते. कोरोनासंदर्भातील सामान निर्यात करणे थांबवा असे आवाहनही करत होते. पण राहुल यांनी सांगितले म्हणून दुर्लक्ष करायचे हे सरकारचे धोरण सुरुच राहील्याचे सामनात म्हटले आहे. 

ही वेळ भांडण्याची नाही. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची काम करण्याची वेगळी शैली आहे. त्यामुळे माझ्या म्हणण्याला टीका न समजता सल्ल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी याकडे पाहावं असं मत त्यांनी सर्वांपुढे ठेवलं होतं.  

सध्याच्या घडीला लागू केलेलं लॉकडाऊन आणि त्याचे अर्थव्यवस्था, देशातील उपलब्ध संसाधनं, अन्नधान्य साठा या साऱ्यावर दिसणारे दूरगामी परिणाम राहुल यांनी अधोरेखित केले. सोबतच परिस्थिती लक्षात घेत भावी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण पाहता त्या दृष्टीने साचेबद्ध पावलं सरकारकडून उचलली गेली पाहिजेत असा सूर त्यांनी आळवला होता. 

कोरोना व्हायरसच्या या आव्हानात्मक काळात भातीयांना सुरक्षितता देण्यासोबतच आपण अर्थव्यवस्थेला हानी तर पोहोचवत नाही आहोत ना याकडेही लक्ष दिलं जाणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले होते. पण राहुल यांच्या म्हणण्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोरोनासंदर्भात एक चर्चा व्हायला हवी असे देखील यातून सुचवण्यात आले आहे.