नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सर्व गटांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. भारतात आता 18 वर्षापुढील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात होतेय. तर रेमडीसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागलाय. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation)एक आनंदाची बातमी दिलीय.
'कोरोना प्रादुर्भाव लवकरच रोखता येईल' असा दावा WHO ने केलाय.कोरोना साथ रोखण्याची सर्व साधनं आपल्याकडे आहेत. योग्य आणि सातत्याने वापर केल्यास कोरोना काही महिन्यात जाईल असं WHO ने म्हटलंय.
मदतीसाठी जगाने एकत्र यावं असं आवाहन WHO चे डायरेक्टर-जनरल, टेड्रॉस ऍडॉनॉम घेब्रेयेसस यांनी केलंय.
इस्राइलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याचे नियम रद्द केले आहेत. तसे पाहता मोठ्या सभांमध्ये मास्क लावणे बंधनकारक आहे. इस्राइलने पूर्ण गतीने आपल्या नागरिकांचे लसीकरण केले आहे. बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.सध्या कोरोना प्रतिबंधक अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात इस्राइलने घोषणा केली होती, ते विदेशी पर्यटकांना देखील लस देणे सुरू करणार आहेत. देशाचे कोरोना प्रतिबंधक अधिकारी नैकमन एशने रविवारी सरकारी रेडिओवरून महत्वाची घोषणा केली.