Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे.  

Updated: May 3, 2021, 02:48 PM IST
Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली title=
Pic / PTI

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन (Oxygen)पुरवण्याच्या समस्येवर दिल्ली उच्च न्यायालय  (Delhi High Court) सुनावणी होत आहे. दिल्ली सरकारच्यावतीने वरिष्ठ वकील जनरल राहुल मेहरा कोर्टात हजर आहेत.

दिल्लीत सैन्य तैनात करण्याची मागणी

ज्येष्ठ महाधिवक्ता राहुल मेहरा म्हणाले की, दिल्लीमधील (Delhi) कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची  (Oxygen) कायम कमतरता आहे. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात लष्कराला दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यासाठी थेट मदत करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालय सध्या या खटल्याची सुनावणी करीत आहे.

 दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. केंद्र सरकारच्या कोट्यानुसार ऑक्सिजन (Oxygen)मिळत नसल्याचे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. त्याच बरोबर, केंद्र सरकार म्हणते की दिल्लीला आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन (Oxygen) मिळत आहे, परंतु तेथे पुरवठा नेटवर्क सुधारण्याची गरज आहे.

या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी  

याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऑक्सिजन (Oxygen) पुरवठा व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी शासनाला सूचना देण्याची मागणी केली जात आहे. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिल्लीत सैन्य तैनात करण्याचे निर्देश द्यावेत, असे आवाहन कोर्टाने केले आहे. जी परिस्थिती हाताळण्यास मदत करू शकते.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बैठक बोलावली

दिल्ली उच्च न्यायालय संध्याकाळपर्यंत या याचिकेवर आदेश जारी करू शकते. अशा परिस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संध्याकाळी महत्वाची बैठक बोलविली आहे. या बैठकीत होम क्वारंटाईन उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा देण्याच्या पद्धतींबद्दल चर्चा केली जाईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह दिल्लीचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.