Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत.   

Updated: Mar 16, 2022, 10:26 PM IST
Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. कोरोनाचा वाढता धोका आणि देशात चौथी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मोठी बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (corona 4th wave health ministry convenes emergency meeting gave this order)

काय निर्णय घेण्यात आले? 

चीनमध्ये झपाट्याने कोरोना हात-पाय पसरतोय. या पार्श्वभूमीवर ही तातडीची बैठक बोलावण्यात आली. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली. ही बैठक तब्बल दीड तास चालली. कोरोनाबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं.

कोरोनाला रोखण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. सोबतच आरटीपीसीआर चाचण्यांबाबतही गांभीर्याने विचार करण्यात यावा, असेही आदेश देण्यात आले. 

BA-2 व्हेरिएंटबाबत WHO सतर्क

कोरोनाच्या या उप प्रकाराला BA-2 असंही नाव देण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाचा हा व्हेरिएंट मूळ प्रकारापेक्षा वेगळा आहे. याला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात अनेक अडचणी येत आहेत. हा BA-2 प्रकार कोविडच्या मूळ प्रकारापेक्षा अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकतो, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.  

BA-2 व्हेरिएंटची लक्षणं काय? 

BA-2 प्रकाराने संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये चक्कर येणे आणि थकवा ही प्रमुख लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ही लक्षणे दिसू लागतात. याशिवाय ताप, अति थकवा, खोकला, घसा खवखवणे, स्नायू पेटके ही त्याची लक्षणे असू शकतात.