मुंबई : बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला घोडेबाजार चांगलाच तेजीत आलाय. सत्ता स्थापनेसाठी आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. याचसंदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी मंत्री आणि खाण माफिया जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध केलीय. रायचूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बसनगौडा दड्डल यांना गळाला लावण्यासाठी जनार्दन रेड्डींनी फोनवरून संपर्क साधल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
घोडेबाजाराबाबत भाजपाचे माजी मंत्री आणि खाणमाफीया जनार्दन रेड्डी यांची ओडीओ क्लिप काँग्रेसकडून प्रसिद्ध रायचूर ग्रामीणचे काँग्रेस बसवनगोडा याला जनार्दन रेड्डी याने फोन केला होता
जनार्दन रेड्डींचा सहकारी - कोण बसनगौडा? मोकळे आहात का?
बसनगौडा दड्डल - होय मीच आहे.
जनार्दन रेड्डी - जे काही आधी झालं ते विसरा. वाईट गोष्टी विसरा. मी सांगतोय तुम्हाला. आता माझी चांगली वेळ सुरू झालीय. मी राष्ट्रीय अध्यक्षांशी तुमची भेट घालून देतो. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला. त्यानंतर आपण ठरवू.
बसनगौडा - नाही सर, मी अखेरची घटका मोजत असताना त्यांनी मला आमदार केलंय.
रेड्डी - मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो....बीएसआरच्या वेळेस आम्ही पक्ष स्थापन केला तेव्हा वाईट अवस्था होती. तेव्हा फार विरोधही होता. मला माहित आहे आमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मोठं नुकसान झालं. पण मी सांगतो आता तुम्हाला १०० पटीनं फायदा होणार. शिवनगौडा नायक माझ्यामुळे मंत्री झाले. आता ते मोठे नेते आहेत आणि स्वत:ची काळजी घेऊ शकतात. हे सर्व माझ्यामुळे घडलंय. राजू गौडांनाही माझ्यामुळे फायदा झालाय.
बसनगौडा दड्डल - होय
रेड्डी - तुमच्या दुर्दैवानं आमची वाईट वेळ सुरू होती. शिवनगौडाचा विजय काहीच उपयोगाचा नाही. तुम्ही मंत्री व्हाल. तुम्हाला कळतंय का? मी थेट मोठ्या मोठ्या माणसाठी तुम्हा भेट घालून देतोय. तुमचं बोलणं करून देतोय ( आवाज तुटला). आतापर्यंत जेवढं कमवलंय त्याच्या १०० पटीनं तुम्ही कमवाल.
बसनगौडा दड्डल - मला माफ करा सर. मी अखेरची घटका मोजत असताना त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मला विजयी केलं. आणि आता अशा परिस्थितीत मी विश्वासघात करू शकत नाही. मी तुमचा आदर करतो.