Congress President Election : देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी मोठी बातमी. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काँग्रेसचा कोण बॉस होणार याचीच मोठी उत्सुकता आहे. प्रथमच गांधी कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही उमेदवारांचं आणि काँग्रेस पक्षाचं भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.
देशभरातून 96 टक्के मतदान झालं. प्रतिस्पर्धी उमेदवारांना कोणत्या राज्यात किती मतं मिळाली, हे कळू नये म्हणून सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. या निवडणुकीमुळे 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं जाणार आहेत.
काँग्रेसला कायम स्वरुपी अध्यक्ष व्हावा, अशी मागणी केली गोली. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची तब्बेत बरी नसते. तसेच त्यांना वयोमानाने देशात फिरता येत नाही. त्यामुळे कायम स्वरुपी अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने घेतला आहे.
अध्यक्षपदासाठी गांधी परिवारातलं कुणीही नको, अशी अनेकांची धारणा होती. राहुल गांधी यांनीही त्यासंबंधीची तयारी दाखवली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. ही नावे मागे पडलीत. मात्र, शशी थरुर हे आधीपासून अध्यक्ष पदाच्या निवडणूक शर्यतीत होते.