मोदी सरकारचे 4 वर्ष, कुमारस्वामींनी दिल्या मोदींना शुभेच्छा

कुमारस्वामींनी मोदींकडे भेटण्यासाठी मागितली वेळ...

Updated: May 26, 2018, 09:47 PM IST
मोदी सरकारचे 4 वर्ष, कुमारस्वामींनी दिल्या मोदींना शुभेच्छा title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. सत्तेसाठी सगळ्यात पक्षांनी जोरदार प्रयत्न केला. भाजपला बहुमत सिद्ध करता न आल्याने 2 दिवसातच सत्ता सोडावी लागली. भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएस पाठिंबा दिला आणि कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं. आता हे सरकार 5 वर्ष टिकतं का याच्या चर्चा सुरु असतांनाच आज केंद्रामध्ये एनडीएस सरकारचे चार वर्ष पूर्ण झाले आहेत. अनेक विरोधी पक्षांनी सरकारच्या 4 वर्षाच्या कामकाजावर टीका केली आहे. 

दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी एनडीए सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याने पीएम नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. जेडीएसने मात्र एनडीएच्या 4 वर्षाच्या कामकाजावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कुमारस्वामींनी म्हटलं की, 'मोदींनी आपल्या भाषणांमध्ये जी आश्वासनं दिली होती. ती ते लागू करु शकले नाहीत. बाकी लोकांनी ठरवावं.'

कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्य़ाकडे भेटण्यासाठी वेळ देखील मागितली आहे. त्यांनी म्हटलं की, 'मला उद्या किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ मिळू शकते. त्यानंतर मी त्यांना आणि काही केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे.'