मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडण्याचा अण्णांचा निर्णय

 आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी ते आपल्या उपोषणाची सांगता करतील.

Updated: Mar 29, 2018, 10:25 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडण्याचा अण्णांचा निर्णय  title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी ते आपल्या उपोषणाची सांगता करतील. 

पंतप्रधान कार्यालय आणि कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अण्णांनी हा निर्णय घेतलाय. या बैठकीत अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यात. आज दुपारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांच्या भेटीसाठी दिल्लीत हजर होणार आहेत. 

दरम्यान, रामलीला मैदानावर उपोषण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे. बुधवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी अण्णांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढल्याने त्यांच्या तब्येत बिघडलेली आहे. यानंतर डॉक्टरांनी अण्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्याची सूचना केली. मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्यास अण्णांनी नकार दिला होता.

काय आहेत अण्णांच्या मागण्या...

आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्टअटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. अण्णांनी त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्याची टीका, यावेळी अण्णा यांनी केली.