ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार

ईदच्याच दिवशी काश्मीर खो-यातल्या विविध भागांत, आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात संघर्ष झाला.

Updated: Jun 26, 2017, 07:36 PM IST
ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार title=

श्रीनगर : ईदच्याच दिवशी काश्मीर खो-यातल्या विविध भागांत, आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात संघर्ष झाला. श्रीनगरमध्ये आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांवर इदगाह आणि गव कडाल इथे दगडफेक केली.

यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला. तर सोपोरमध्ये ईदच्या नमाजनंतर झालेल्या संघर्षात बाराहून जास्त आंदोलक जखमी झाले. अनंतनाग, कुलगाम, शोपीयन आणि पलहालनमध्येही पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.