10 वी पास तरूणांसाठी कोर्टामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या...

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना न्यायालयात काम करण्याची मोठी संधी 

Updated: Sep 17, 2022, 06:26 PM IST
10 वी पास तरूणांसाठी कोर्टामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या... title=

Civil Court Recruitmen : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. दिवाणी न्यायालयात 7692 पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती लिपिक (क्लर्क), लघुलेखक (स्टेनोग्राफर), कोर्ट रीडर आणि शिपाई या पदांसाठी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. 16 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत अधिसूचनेतून उमेदवार अधिक माहिती मिळवू शकतात. (Civil Court Recruitmen in Bihar) 

https://districts.ecourts.gov.in/patna या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली जाईल. कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. माहितीनुसार, उमेदवार 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत या पदांसाठी अर्ज करू शकतात. बिहार राज्यातील दिवाणी न्यायालयात ही भरती होणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या वेबसाईटवर संपुर्ण माहिती घ्यावी. 

पात्रता
दिवाणी न्यायालयातील बहुतेक पदांवर भरतीसाठी पदवीधारक म्हणजेच ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शिपाई पदासाठी किमान मॅट्रिक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

जागा
क्लर्क 3325 तर लघुलेखक 1562, कोर्ट रीडर 1132 आणि शिपाई पदासाठी 1673 पदांची भरती केली जाणार आहे. भरतीचे तपशीलवार अर्ज - 16 सप्टेंबर 2022, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया - 20 सप्टेंबर 2022 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2022 अशी राहणार आहे.