मुंबई : मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड वाढतच आहे. ज्यामुळे अनेक मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. चीडचीड वाढल्याने मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे पालकांनाही अडचणीत आणत आहेत. छतरपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने ऑनलाईन गेममध्ये पराभूत झाल्याने आत्महत्या केली. ऑनलाईन गेमच्या नादामुळे मुलांना चोरीच्यादेखील सवयी लागत आहेत. याशिवाय अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. सायबर सेलने मुलांसाठी काही सूचना दिल्या आहेत.
एकीकडे सायबर सेलने मुलांना मोबाईल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे या दिवसांमध्ये कोरोनामुळे मुलांना ऑनलाईन शिकवले जात आहे. हे पालकांसाठी आव्हान आहे. परंतु मुलांच्या भविष्यासाठी तारेवरची कसरत पालकांनी करणे भाग आहे.