नवी दिल्ली: देशाच्या सरन्यायाधीशालाच खटले वाटपाचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत. खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एम एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला. जानेवारी महिन्यात याविषयी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी सध्याच्या खटले वाटपाच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवला. त्यानंतर यामुद्द्यावर जनहित याचिका करण्यात आली. आज खंडपिठानं ही याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठानं हा निकाल दिला.