नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त पुस्तक मागे घेणार नाही. तर त्याचे पुनर्लेखन करणार असल्याचे मत भाजप नेते जय भगवान गोयल यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, गोयल यांच्या पुस्तकावरुन भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. गोयल पुस्तक कसे मागे घेणार नाही, ते बघतो असा इशाराही उद्यनराजे यांनी दिला होता. दरम्यान, तर वादग्रस्त पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाचण्यासाठी देणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
गोयल यांनी शिवसेना यांच्यावर जोरदार टीका केली शिवसेने ऐवजी सोनियासेना नामकरण करण्याचा सल्लाही गोयल यांनी दिला. सत्तेसाठी शिवसेनेने शिवाजी महाराजांचे नाव वापरले आणि काॅंग्रेस सोबत गेली. मी तर शिवाजी महाराजांच्या गुणाबद्दल लिहले आहे. उदयनराजे भोसले बोलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांच्या वंशजांनीच आता शिवसेनेची जागा दाखवली आहे, असे गोयल म्हणालेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो, असे उदयनराजे म्हणालेत. पुस्तकाबद्दल जे ऐकायला मिळाले आहे, त्याबद्दल वाईट वाटले. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही, असंही ते म्हणालेत
- कुठल्याच देशात त्या त्या देशातील योद्ध्यांची प्रतिमा धार्मिक स्थळी ठेवत नाहीत, मात्र शिवाजी महाराजांची ठवेली जाते हे त्यांचं मोठेपण
- तुलना होऊच शकत नाही, पण आपण त्यांचं अनुकरण करू शकतो, त्यांच्यासारख होण्याचा प्रयत्न करू शकतो
- लुडबुड करणाऱ्यांच मी नाव घेणार नाही. त्या घराण्यात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, ते मी माझे सौभाग्य समजतो
- मी वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही, मिरवलो नाही. शिवसेना नाव घेताना वंशजांना विचारलं होतं का?
- देशातला प्रत्येकजण शिवाजींचा वंशज. विचारांचा वारसा सगळ्यां ना लाभलेला आहे, महाराजांनी कधी जातीभेद केला नाही
- दादरच्या शिवसेना भावना वरील चित्र बघा, महाराज कुठे पाहिजे होते, वंशज म्हणून आम्ही सत्तेच्या मागे कुत्र्यासारखे फिरलो नाही
- खासदारकी बिसदार की सोडा, मी मनाला पटलं ते करतो. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवा तुमची वेळ संपत आलाय
- सतेस्थानी ते सो कोल्ड जाणता राजा आहे ना, मग आरक्षणाचा विषय का पेंडींग आहेव
- शेतकरी मारायला लागले आणि ह्यांची हॉटेलमधून पळवापळवी, ह्यांना जनतेच काही पडलेलं नाही, म्हणे जाणते राजे
- शिवसेना काढून ठाकरे सेना करा. नाव बदला, मग बघू किती तरुण तुमच्या पाठिशी राहातता
- जातीय दंगली घडवून आणल्या, श्रीकृष्ण आयोगाने म्हटलंय. ते मूर्ख आहेत का?
- शिवजयंतीची 19 फेब्रुवारी तारीख ठरवली, तरीही 3 शिवजयंती. आणखी किती मानहानी करणार ?
- अरबी समुद्रातील स्मारकराच काय झालं, मागेच व्हायला पाहिजे होतं
- हे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात, स्वार्थ साधला की वेगळे होतात...
- कुणाला काही पडलेलं नाही, त्यातून नक्षलवादी तयार होतात
- यापुढे महाराजांचं नाव काढायचं नाही, तुमच्या कपटीपणाचे खापर आमच्यावर फोडलं तर परिणामांना सामोरं जावं लागेल, परिणाम काय होतील ते माहीत नाही
- आजपर्यंत महाराजांच्या नावाचं फक्त राजकारणच केलंय, कुणाला काही पडलेलं नाही
- तुम्ही त्यांच्या हातातील कटपुटली बनणार का असा माझा जनतेला प्रश्न आहे
- तुमचा वापर होऊ देऊ नका, अन्यथा देशाचे तुकडे होतील
- जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल त्यांनी मौन पाळले
- जाणत्या राजानी तर बोललाच पाहिजे, जाणता राजा एकच आहे
- सावध राहा नाहीतर जनता तांगुडून मारेल, मग माझ्याकडे आला तरी मी गय करणार नाही