Parents Wedding AI Video: सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा जमाना आहे. फोटो, व्हिडीओ एडीट करण्यापासून ते कंटेट जनरेट करण्यापर्यंत सर्वजण एआयचा वापर करतात. ज्या गोष्टींसाठी कौशल्य असलेल्या माणसांची गरज लागायची, ते काम एआय एका क्लिकवर करतंय. आजकाल टीव्हीवर एआय अॅंकर्सदेखील दिसू लागले आहेत. एआयच्या निमित्ताने माणसं इतिहासाला उजाळा देऊ लागली आहेत. अशीच आपल्या आई वडिलांची आठवण एका तरुणाने जागी केली आहे.
रॅक्सच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार तो चेन्नईला राहतो. रॅक्स हा रजनीकांतचा मोठा चाहता आहे. त्याचा वर्डप्रेसवर रॅक्स अप्पन नावाचा ब्लॉगदेखील आहे.रॅक्स थलैवर फॅनेटिक असे नाव त्याने या ब्लॉगला दिलंय.
आई वडिलांच्या लग्नातले फोटो मुले आवडीने पाहतात. त्यावेळी आपले आई बाबा कसे दिसायचे हे त्यांना यातून कळतं. रॅक्स नावाच्या तरुणाकडे त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा व्हिडीओ नव्हता. आई वडिलांच्या लग्नाची आठवण व्हिडीओ माध्यमातून असावी, असे त्याला वाटत होते. यासाठी त्याने एआयची मदत घेतली. एआयमधील रनवे टूल वापरुन त्याने आई वडिलांच्या लग्नातील फोटोंचा व्हिडीओ बनवला.
My Parents never had a marriage video, so created this one using Ai Tool pic.twitter.com/1Kj7RBD7AR
— Rakks ✰ (@rakks_twitz) September 18, 2024
आई बाबांच्या फोटोला त्याने मोशन्स जोडले. यामुळे लग्नावेळीच हुबेहुब चालल्याप्रमाणे ते दिसत आहेत. रॅक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केलाय. माझ्या आई वडिलांकडे त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ नव्हता. म्हणून मी एआयच्या मदतीने व्हिडीओ बनवला असे त्यात त्याने लिहिले आहे. या व्हिडीओवर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ तू कसा बनवलास? कोणत्या टूल्सची मदत घेतलीस? असे अनेक प्रश्न त्याला विचारले जात आहेत. रॅक्सदेखील या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे.
एआयच्या मदतीने रॅक्सने लग्नाचे विश्व तयार केले आहे. त्यात फोटोतील आई बाबांच्या डोळ्याची उघडझाप होत असल्याने तो व्हिडीओ आणखी खरा असल्याचे भासते.