चेन्नई : सगळा देश इंधन दरवाढीत होरपळत असताना तामिळनाडूतल्या एका भाजप नेत्याची अरेरावी समोर आलीये. तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सौंद्राराजन ह्या पत्रकारांशी बोलत असताना त्यांना एका ऑटो रिक्षा चालकानं वाढत्या इंधन दरवाढीबद्दल विचारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या एका नेत्यानं या रिक्षा चालकाला जोरदार धक्काबुक्की करत हाकलून दिलं.
भाववाढीबद्दल जनतेची प्रतिक्रिया आणि त्याला या भाजप नेत्यानं दिलेला प्रतिसाद कॅमेऱ्यात टिपला गेला.