नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यान मालेचा दुसरा भाग आज दिल्लीत संपन्न होणार आहे. व्याख्यानाच्या आजच्या भागात मोहन भागवत संघाच्या दृष्टीनं हिंदू धर्माची संकल्पना काय आहे? याचं विश्लेषण करणार आहेत.
कालच्या व्याख्यानात त्यांनी हिंदू आणि हिंदूत्व यांची व्याख्या करताना काही मुद्दे मांडले. त्याचवेळी आजच्या भागात त्यावर सविस्तर विश्लेषण व्याख्यनात पुढे येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तीन दिवस चालणाऱ्या व्याख्यान मालेचा आजचा दुसरा दिवस आहे.
दरम्यान, व्याख्यानाच्या पहिल्या भागात देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान होते. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे.
दिल्ली येथे संघाच्या वतीने आयोजीत तीन दिवसीय अधिवेशनात ते बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असेही ते म्हणाले