Home Loan Calculator: 25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज? सर्व हिशोब सोप्या भाषेत

तुम्हाला किती पगारावर किती गृहकर्ज मिळेल, यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Updated: Sep 24, 2022, 07:28 PM IST
Home Loan Calculator: 25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज? सर्व हिशोब सोप्या भाषेत title=

Home Loan Calculator: आपलं हक्काचं घर असावं, अशी प्रत्येकाचीच भावना असते. अशात म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बजेट होमचं ( Dream of own house) स्वप्न सहज पूर्ण करू शकतात. मात्र घर घ्यायचं म्हणजे तुमचा पगार पहिला जातो, नोकरीचं स्थैर्य पाहिलं जातं. शेवटी बँक तुम्हाला साधारणतः तुमच्या घराच्या एकूण किमतीपेक्षा 85% ते 90% गृहकर्ज देतात  (Home Loan Eligibility) अशात तुमचा पगार जर 25,000 रुपये असेल तर तुम्हाला नेमकं किती  गृहकर्ज मिळेल? जाणून घेऊया.. 

तुम्हाला गृहकर्ज मिळण्यासाठीची पात्रता 

तुम्हाला किती पगारावर किती गृहकर्ज मिळेल, यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी तुमचं वय 18 - 70 वर्षांपर्यंत असावं, तुमचं किमान उत्पन्न Rs.25,000 असावं, तुमचा क्रेडिट स्कोअर 750 वर (Credit Score) असावा, किमान दोन वर्ष नोकरीचा अनुभव असावा. तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं हा निर्णय सर्वस्वी बँक किंवा ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेणार आहात यांवर आहे. 

25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज?

एका प्रसिद्ध नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या (NBFC) मते तुम्हाला मिळणाऱ्या गृहकर्जाची रक्कम ही तुमच्या (Home Loan)  हातात पडणाऱ्या पगारावर अवलंबून असते (In Hand Salary). तुमच्या एकूण पगारात काटछाट होऊन ( प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, इंश्युरन्स, प्रोफेशनल टॅक्स, इत्यादी...) ( PF, Gratuity, Insurance, Professional Tax) हातात किती पैसे येतात हे सर्वात आधी पाहिलं जातं. 

यानंतर तुमच्या डोक्यावर इतर काही कर्ज आहे का? तुम्ही कुणाच्या कर्जासाठी गॅरेंटर राहिला असाल तर तो व्यक्ती करंज परत फेडतोय का? हे देखील तपासलं जातं. 

तुम्हाला किती रुपये मिळेल गृहकर्ज? (How much Home Loan I will get) 

वरील सर्व अटी आणि शर्थींची तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्हाला तुमच्या टेक होम सॅलरीवर जास्तीत जास्त लोन मिळू शकतं. अशा स्थितीत तुम्हाला लागणारं व्याज देखील कमी लागू शकतं.  

तुमची टेक होम सॅलरी 25,000 रुपये असले तर तुम्हाला साधारणतः 18.50 लाख रुपये कर्ज मिळू शकेल. 

गृहकर्जाचा अर्ज भारण्याआधी ध्यानात ठेवा 

(Things to do before applying for home loan ) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट आणि सिबिल स्कोअर (Credit Score and Cibil Score)  चांगला आहे की नाही हे तपासून घ्या. हे रिपोर्ट्स तुम्ही केवळ 500 भरून ऑनलाईन मिळवू शकतात. गरज भासल्यास तुमच्यावर इतर कोणती कर्ज असतील तर ती फेडून टाका. तुमचं कार लोन(Car Loan), बाईक लोन (Two Wheeler Loan) किंवा पर्सनल लोन (Personal Loan) तुमच्या गृहकर्जाच्या अडथळा ठरू शकतो. तुमचं वय जेवढं कमी असेल तेवढं चांगलं, कारण यामुळे तुमाला कर्जाची मुदत वाढवता येऊ शकते. गरज भासल्यास तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला सोबत घेऊन, एकत्रित गृहकर्ज काढू शकतात.

check your home loan eligiblity how much loan you will get on 25 thousand salary