VIDEO : 'पाय नसले' तरी तरी जगता येतं, आजोबांची जिद्द तुम्हाला जगणं शिकवून जाईल, पाहा व्हीडिओ

Viral Video : व्हीडिओ पाहून तुम्हाला निश्चितच जगण्याची प्रेरणा मिळेल. तसंच आयुष्याकडे पाहण्याचा (Positive Thinking) दृष्टीकोन सापडेल.   

Updated: Sep 24, 2022, 07:08 PM IST
VIDEO : 'पाय नसले' तरी  तरी जगता येतं, आजोबांची जिद्द तुम्हाला जगणं शिकवून जाईल, पाहा व्हीडिओ title=

Viral Video : रोजच्या धकाधकीच्या (Routine) आयुष्यात प्रत्येकाला आव्हानांचा सामना करावा लागतो. काही जण या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करतात. मात्र काही जण हे आयुष्यात आलेल्या आव्हानांना, समस्यांना वैतागून माघार घेतात किंवा मग टोकाचं पाउल उचलतात. प्रतिकूल परिस्थितीला आपल्यावर वरचढ होऊ न देता कसं जगायचं हे तंत्र अवघ्या काहींनाच जमतं. पण समस्यांना वैतागून, मला जमणार नाही,असं सांगून काही जण काढता पाय घेतात. सोशल मीडियावर (Social Media)  एक व्हीडिओ व्हायरल झालाय. तो व्हीडिओ पाहून तुम्हाला निश्चितच जगण्याची प्रेरणा मिळेल. तसंच आयुष्याकडे पाहण्याचा (Positive Thinking) दृष्टीकोन सापडेल. (viral older man working on petrol pump inspiring video viral on social media)

या व्हायरल व्हीडिओमधील आजोबा हे दिव्यांग आहेत. चालता येत नसल्याने ते चाकं असलेल्या चौरस फळीचा वापर करतात. ज्या वयात आपल्या नातवंडांना खेळवायचं असतं, त्या वयात हे आजोबा पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतायेत. 

हे आजोबा पेट्रोल पंपावर (Petrol Pump) वाहनांमध्ये हवा भरण्याचं काम करतात. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील हातखंबा पेट्रोल पंपावर (Hatkhamba Petrol Pump)  हे आजोबा काम करत असल्याचा दावा या व्हीडिओत करण्यात आला आहे. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या वयातही आजोबांचा जगण्यसाठीचा संघर्ष आणि उत्साह हा आयु्ष्याकडे नकारत्मकतेने पाहणाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल, हे नक्कीच.