Prakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Case against Prakash Raj: कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्रकाश राज यांनी चांद्रयान3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 22, 2023, 04:25 PM IST
Prakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल title=

Prakash Raj Comment on Chandrayaan 3 Mission: बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 मोहिमेवर केलेल्या पोस्टमुळे प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात (Karnatak) प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 (Chandrayaan 3) संबंधी एक पोस्ट केली होती, त्यातील कार्टून पाहून अनेकजण संतापले आहेत. प्रकाश राज यांनी केलेल्या पोस्टमध्ये इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख के सिवन यांना शर्ट आणि लुंगी घातलेलं दाखवलं असून त्यांना चहावाल्याच्या रुपात दाखवलं आहे.  'विक्रम लँडरने (Vikram Lander) चंद्रावरुन पाठवलेला पहिला फोटो,' असं प्रकाश राज यांनी लिहिलं होतं. 

प्रकाश राज यांचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण दिंल आहे. ज्यांच्या डोळ्यात द्वेष आहे त्यांना फक्त द्वेषच दिसतो. चंद्रावर पहिलं पाऊलट टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगच्या काळातील एका विनोदाचा संदर्भत देत आमच्या केरळच्या चहावाल्याचं सेलिब्रेशन मी करत होतो. ट्रोलर्सने कोणता चहावाला पाहिला? जर तुम्हाला विनोद कळला नसेल तर तो विनोद तुमच्यासाठीच आहे, असं उत्तर प्रकाश राज यांनी टोलर्सना दिलं आहे.  पण युजर्सच्यामते इतक्या मोठ्या व्यक्तीने अशा प्रकारच्या पोस्टपासून दूर राहिला हवं. चांद्रयान मोहिम ही कोणा एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट असल्याचं युजर्सने म्हटलं आहे. 

23 ऑगस्टला सॉफ्ट लाँचिंग
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-3  बुधवारी म्हणजे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर उतरेल. मोहिमेचे आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी ठरले आहेत. यापुढचा चंद्रावर यान उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पाही यशस्वी होईल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. भारत यशस्वीपणे चंद्रावर यान उतरवणार की नाही हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होणार असतानाच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यान चंद्रावर उतरण्याआधीचे काही मिनिटं फार महत्वाचे असतील.

ISRO ने ट्वीट करत हे लँडिग कुठे, कधी आणि कसं पाहता येईल याची माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला बंगळुरुच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये (Mission Control Centre) जाण्याची गरज नाही. 

ISRO ची वेबसाइट -  https://www.isro.gov.in/
YouTube - https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook - https://www.facebook.com/ISRO
किंवा डीडी नॅशनल टीव्हीवरही तुम्ही हे लाईव्ह पाहू शकता.