चंडीगड : बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या राम रहिमला तुरुंगात एक आठवडा झाला आहे. तुरुंगात त्याला ४० रुपये प्रतिदिनावर माळीकाम दिले गेले आहे. राजेशाही थाटात राहणाऱ्या डेरा प्रमुखला हे कठीण जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ बाय ८ च्या जागेत रहीम भिंतीसोबत गप्पा मारत असतो. मला पाठीचा त्रास असून मानलेली मुलगी हनीप्रीत मसाज करते म्हणून तिला सहायक म्हणून ठेवण्याची मागणी गुरमीतने सीबीआयला केली आहे.
त्याने दोनदा असा अर्ज केला असून त्यात वेगवेगळी कारणे दिली आहेत. पण डॉक्टरांनी त्याचे हे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. रोहतक तुरुंगात गेल्यावर त्याने पहिल्यांदा नाटके करायला सुरुवात केली होती.
हायपरटेंशन, पाठीचा त्रास, मधुमेहाचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले. याची तपासणी करण्यासाठी तीन डॉक्टरांना बोलविण्यात आले. पण त्याचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर त्याने पुन्हा कोर्टात याचिका केली. ही याचिका कोर्टाने फेटाळली. मला पाठीचा त्रास असून हनीप्रीत ही फिजिओथेरीपी आणि मसाज करते म्हणून तिला सोबत ठेवावे असे त्याने म्हटले.