VIDEO : घोडेस्वारी करणाऱ्या 'त्या' मुलीविषयी आनंद महिंद्रा म्हणतात, "She’s my hero.."

सोशल मीडियावर व्हायरल होणारा तिचा व्हिडिओ पाहिला का? 

Updated: Apr 9, 2019, 09:55 PM IST
VIDEO : घोडेस्वारी करणाऱ्या 'त्या' मुलीविषयी आनंद महिंद्रा म्हणतात, "She’s my hero.."  title=

मुंबई : 'व्हायरल म्हणजे काय रे भाऊ?', असं विचारणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाली आहे. कारण त्याचा प्रत्यक्ष प्रत्ययच रोजच्या जीवनात पाहायला मिळत आहे. एखादा फोटो म्हणू नका किंवा मग व्हिडिओ, व्हायरल या एका शब्दामुळे असे कित्येक सर्वसामान्य चेहरे प्रसिद्धीझोतात येतात. सध्या केरळमधील एका शालेय मुलीविषयी अशाच चर्चा रंगत आहेत. शालेय परीक्षेच्या शेवटच्या दिवशी थेट घोड्यावर स्वार होत एखाद्या वीरांगमेप्रमाणे ती निघाली आणि बस्स.... पाहता पाहता तिचा हा अंदाज सोशल मीडियाव #GirlPower या हॅशटॅगअंतर्गत चर्चेत आला. 

सीए क्रिष्णा असं त्या घोडेस्वारी करणाऱ्या मुलीचं नाव असून, तिला स्वत:च्या प्रेरणास्थानी मानत 'महिंद्रा ऍण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'द न्यूज मिनिट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शाळेच्या परीक्षेसाठी घोडेस्वारी करत जाण्याचा पर्याय खुद्द क्रिष्णानेच निवडला होता. अनेकांना तिचा हा निर्णय म्हणजे वेडेपणाचा कळसही वाटला. पण, यापूर्वीही अशा प्रकारे आपण शाळेत गेल्याचं सांगत क्रिष्णा मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. तिचा हाच अंदाज आनंद महिंद्रा यांना भावला असून, त्यांनी ट्विट करत भविष्याकडे पाहण्याचा एक आशावादी दृष्टीकोन या मुलीने दिल्याचं त्यांनी ट्विट करत म्हटलं. 

कोण आहे क्रिष्णा? 

मूळच्या केरळच्या थ्रिसूर येथील माला, या गावातील असणारी क्रिष्णा ही तिच्या आई- वडिलांची एकुलती एक मुलगी आहेत. तिचे वडील हे मंदिरात पौरोहित्याचं काम करतात तर, आई गृहिणी आहे. वडिलांनीच कृष्णाला दोन घोडे भेट स्वरुपात दिले होते. क्रिष्णाच्या प्रशिक्षकांपैकीच एकाने तिचा घोडेस्वारीचा व्हिडिओ चित्रीत करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मुळात यापूर्वीही तिने अशा प्रकारे घोडेस्वारी केली होती. पण, तेव्हा तिच्याकडे कुतूहलपूर्ण नजरांचीच गर्दी जास्त असायची. त्यापलीकडे जाऊन अशा प्रकारची प्रसिद्धी तिला मिळाली नव्हती. व्हायरल झालेला हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचला तेव्हा कुठे आपण चर्चेत असल्याची माहिती तिला मिळली. क्रिष्णाचा हा अनोखा अंदाज सध्याच्या घडीला अनेकांचीच मनं जिंकत आहे हे मात्र तितकच खरं.