VIDEO: आजीच्या गळ्यातील चेन खेचली...बाईक वरुन पळणार इतक्यातच..' चोरांना तात्काळ मिळालं कर्माचं फळ

Chain Snatchers Video:  दोन चेन स्नॅचर चोरांना त्यांच्या कर्माचे फळ तात्काळ मिळाले. हा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. 

Pravin Dabholkar | Updated: May 30, 2024, 03:55 PM IST
VIDEO: आजीच्या गळ्यातील चेन खेचली...बाईक वरुन पळणार इतक्यातच..' चोरांना तात्काळ मिळालं कर्माचं फळ title=
Chain Snatchers Viral Video

Chain Snatchers Video: आपल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला मिळते असे म्हणतात. काहींना ते मिळायला उशीर लागतो तर काहींना ते तात्काळ मिळते. दोन चेन स्नॅचर चोरांना त्यांच्या कर्माचे फळ तात्काळ मिळाले. हा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया. 

रस्त्याच्या एका बाजूने एक आजीबाई चालतायत..दरम्यान एक चोर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळून जातोय. चोराचा साथीदार थोड्या अंतरावर बाईकवर बसून वाट पाहतोय. चेन चोरुन पहिला चोर बाईकच्या दिशेने पळतोय. आजीबाई मागून चोर चोर म्हणून ओरडतायत. आता पहिला चोर बाईकवर बसलाय..बाईक स्टार्ट होणार इतक्यात कहाणीत ट्विस्ट आला. 

असं काही घडलं ज्याचा विचार चोरांनी चोरीचा प्लान करताना अजिबात केला नसेल. या ट्विस्टमुळेच चोरांची चोरी फसली. समोरुन आलेल्या बसने चोरांना धडक दिली. यामुळे चोरांची बाईक जागेवरच पडली. चोरांनी तिथून धूम ठोकली. 

पाहा व्हिडीओ

 

पुढे बसमधून काही प्रवासी उतरले. मागून आजीबाई आपली चेन चोरल्याचे त्यांना सांगत होत्या. पण दुर्देवाने त्यातील कोणत्याही प्रवाशांना त्या चोरांच्या मागे पळावंसं वाटलं नाही. आजीबाईंना मदत करावीशी वाटली नाही. ते आजींना शाब्दीक सहानभूती देताना दिसले. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्हीत कैद झालाय. 

बस ड्रायव्हरचं होतंय कौतुक

हा व्हिडीओ हरियाणामधील असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत असून लोकं बस ड्रायव्हरचे कौतुक करत आहेत. अशा बस ड्रायव्हरची देशाला गरज आहे, अशा कमेंट्स केल्या जातायत. इतर घटनांमध्ये बस ड्रायव्हरने समोरुन कोणाला ठोकर दिल्यास त्याला अटक होते. पण या घटनेत सर्वजण बस चालकाच्या बाजुने असल्याचे सोशल मीडियात दिसत आहेत. चोरांना थांबवण्यासाठी बस ड्रायव्हरने मुद्दाम बस ठोकली असे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ केव्हाचा आहे हे स्पष्ट झाले नसले तरी कर्माचे फळ तात्काळ मिळते अशा कॅप्शनसह तो व्हायरल केला जातोय.