कडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ

Washing Machine Fire: यंदा भीषण उन्हाळा सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी तापमानाने पन्नाशी गाठली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 30, 2024, 04:24 PM IST
कडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ title=
Washing Machine in Balcony Burnt to Ashes as Heatwave

Washing Machine Fire: महाराष्ट्रात भीषण उन्हाळा सुरू आहे. तापमान वाढीमुळं धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातदेखील भयंकर गरमी पडली आहे. नवी दिल्लीत तापमानाने 50 अंशाचा पारा गाठला होता. या भयंकर उन्हाळ्यामुळं एसी, कुलर आणि पंखा यासारख्या विजेवर चालणाऱ्या उपकरांना आग लागण्याच्या धोकादेखील वाढला आहे. दिल्लीतील गाझियाबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बंद पडलेल्या वॉशिंग मशीनमध्ये आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या कचाड्यात सापडले. मात्र, घरातील लोकांच्या वेळेत लक्षात आल्याने त्यांनी आगीवर नियंत्रण आणले आणि मोठी दुर्घटना टळली आहे. 

गाझियाबादच्या राजनगर एक्सटेंशनच्या एका सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीतील एका फ्लॅटच्या बाल्कनीत बंद पडलेली वॉशिंग मशीन ठेवली होती. पण उष्णतेमुळं या मशीनला अचानक आग लागली. शेजारच्या लोकांनी बाल्कनीमध्ये आग लागल्याचे कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत लगेचच आगीवर नियंत्रण आणले त्यामुळं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या दिवसांत वॉशिंग मशीन अशा ठिकाणी ठेवा जिथे उन कमी येत असेल. कडक उन्हात वॉशिंग मशीन ठेवण्याचे टाळा. कारण वॉशिंग मशीनच्या मोटरमध्ये लिक्विड ऑइल असते. जे ऑइल उच्चांकी तापमानाच्या संपर्कात आल्यास यात आग लागू शकते. त्याचबरोबर उन्हात मशीन ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही स्विच ऑन करता तेव्हा ही आग लागण्याचा धोका असू शकतो. गाझियाबादमध्येही मशीन उन्हात ठेवल्यामुळं आग लागली. जर, वॉशिंग मशीन ठेवलेल्या ठिकाणी खूप उन येत असेल तर मशीनवर एक मोठा कपडा टाकून ठेवा. 

एसीला आग 

इंदापुरममध्येही एका फ्लॅटमध्ये लावलेला स्पिल्ट एसीचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामुळं संपूर्ण खोलीला आग लागली होती. पोलिस व अग्नीशमन दलाच्या घटना घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवली. जेव्हा घटना घडली तेव्हा एसी सुरू होता. आता बहुतांश घरात स्प्लिट एसी लावले आहेत. त्यातील एक हिस्सा घराच्या बाहेर लावलेला असतो. जो गरम हवा खोलीबाहेर फेकतो. तर एसीचा तो हिस्सा कडक उन्हात ठेवला असेल तर त्यालाही आग लागण्याची शक्यता असते. तर, अनेकदा कित्येत तास एसी सुरू राहिल्यामुळंही कंप्रेसरचा स्फोट होऊ शकतो. तसंच, शॉर्ट सर्किटमुळंही आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळं एसी शक्यतो दिवसा दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लावू नका. दोन तास लावल्यानंतर अर्धा तास बंद करा नंतर पुन्हा लावा.