उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!

सर्वसामान्य ग्राहकांना आता हॉटेलमध्ये बिनधास्त खाता येणार आहे. 

Updated: Nov 14, 2017, 08:32 PM IST
उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा! title=

मुंबई : सर्वसामान्य ग्राहकांना आता हॉटेलमध्ये बिनधास्त खाता येणार आहे. सर्व प्रकारच्या हॉटेलमध्ये जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाची बुधवारपासून अंमलबजावणी सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी लागू होण्यापूर्वी हॉटेलमधील पदार्थांच्या किंमतीत व्हॅटचा समावेश होता. जीएसटी लागू झाल्यानंतर हॉटेल मालकांनी व्हॅटसह लावलेल्या किंमती कायम ठेवल्या. आता व्हॅट कमी करून हॉटेलमधील पदार्थांचे दर लावावेत, बदललेल्या दरांचे पत्रक उपलब्ध करून द्यावे असे आदेश सरकारने दिलेत.

व्हॅटसह पदार्थाचे दर लावणारे आणि नवे दरपत्रक न लावणा-यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना तक्रार करता यावी यासाठी सरकार हेल्पलाईनही सुरु करणार आहे. १८००-२२५-९०० ही हेल्पलाईन सरकार सुरू करणार आहे.