उस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 

Updated: Jun 6, 2018, 04:05 PM IST

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ८ हजार कोटींच्या पॅकेजला हिरवा बावटा दाखवण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेशातल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला ऊसाच्या मुद्द्यावरुन पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवाची गंभीर दखल घेत, केंद्रातल्या भाजप सरकारनं हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. दरम्यान साखर कारखान्यातून निघणाऱ्या साखरेची किमान आधारभूत किंमत २९ रुपये निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. तर ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचीही तयारी सुरु आहे. देशातल्या साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांची तब्बल २२ हजार कोटींची रक्कम बाकी आहे. यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातल्याच शेतकऱ्यांची १३ हजार कोटींची रक्कम बाकी आहे.