मुंबई : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा (CDS General Bipin Rawat) बुधवारी 8 डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या एक दिवस आधी बिपीन रावत यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता. आम्हाला आमच्या सैन्याबाबत अभिमान आहे. या आपण सर्व एकत्र येऊन विजय पर्व साजरा करुयात. हा व्हीडिओ एएनआने ट्विट केला आहे. या व्हीडिओत रावत यांनी 1971 च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सैन्य दलाचं कौतुंक केलं आहे. (CDS Bipin Rawat had recorded message for Vijay Parv even before helicopter crash accident)
सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हीडिओ 7 डिसेंबरच्या संध्याकाळी रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हीडिओत जनरल रावत यांनी 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या ऐतिहासिक युद्धाच्या विजयाचं 50 वं वर्ष साजरा करण्याचे आवाहन केलं.
व्हीडिओत काय म्हंटलंय?
"लष्करी विजयाच्या ऐतिहासिक कामगिरीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी सैन्य दलांच्या सर्व शूर जवानांचं अभिनंदन करतो. आपण 1971 च्या ऐतिहासिक विजयाचं 50 वं वर्ष आपण विजय पर्व म्हणून साजरा करतोय. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. सर्वांनी हा विजय पर्व एकत्र साजरा करुयात", असं सीडीएस प्रमुख म्हणाले होते.
हा व्हीडिओ इंडिया गेटच्या परिसरात विजय पर्वाच्या समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात हा व्हीडिओ प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनात सिंह आणि सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी 16 डिसेंबर 1971 मध्ये भारतीय लष्कर आणि 'मुक्ती वाहिनीसमोर गुड़घे टेकले होते. ज्यामुळे बांगलादेशच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
मुक्तीवाहिनी म्हणजे काय?
मुक्तिवाहिनी बंगाली शब्द आहे. स्वातंत्र्य सैनिक किंवा आझाद सेना असाही होतो.
#WATCH Late CDS General Bipin Rawat's pre-recorded message played at an event on the occasion 'Swarnim Vijay Parv' inaugurated today at India Gate lawns in Delhi. This message was recorded on December 7.
(Source: Indian Army) pic.twitter.com/trWYx7ogSy
— ANI (@ANI) December 12, 2021