crime news : भाडेकरु आणि घरमाल यांच्यात वाद विवाद झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. डेहराडूनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. भाडेकरुने घर मालकाच्या मांजरीसह अश्लिल कृत्य केले आहे. भाडेकरुला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
पवन कुमार पासवान असे आरोपीचे नाव आहे. पासवान हा आपल्या तीन मित्रांसह तक्रारदार महिलेच्या घरात भाडेकरुन म्हणून राहत होता. घर मालक असलेल्या या महिलेने पासवान याने आपल्या पाळीव मांजरीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार महिला कँट कोतवाली परिसरात राहते. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीने मांजरीला आपल्या खोलीत नेले. यानंतर आरोपीने माजंरीसह अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. मांजरीचा आवाज आल्याने मी पासवान याच्या खोलीत गेले त्यावेळी तो मांजरीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करत होता असे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. पासवान याचे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आणि पशूंवर अत्याचार करणारे आहे आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
मांजरीला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजराची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आरोपी हा बिहारचा रहिवासी आहे. त्याच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे.
यापूर्वी श्वानावर लैंगिक अत्याच झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, मांजरीवर बलात्कार झाल्याची ही पहिलीच घटना असावी. या विचित्र प्रकरणामुळे पोलिसही अंचबित झाले आहेत. प्राणीही सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.