मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

Corona Positive : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Updated: Nov 8, 2022, 10:25 PM IST
मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती title=

नवी दिल्ली : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सिंधिया यांनी  त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून म्हटले की, 'मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी.'