केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Updated: Sep 2, 2017, 10:01 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित  title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम हि नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यूपी आणि बिहारमधून प्रत्येकी दोन मंत्री मिळण्याची शक्यता सुत्रांनी दिलीय. 

रविवारी होणाऱ्या विस्ताराआधी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी दिवसभर सुरू होत्या. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणूका, जातींची समीकरणं, मंत्र्यांची तीन वर्षातली कामगिरी आणि २०१९च्या निवडणूक या निकषावर आधारित विस्तार केला जाणार आहे.