चेन्नई : नीच परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूतील अनिताने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
तामिळनाडूत मेडिकलसाठी प्रवेश १२ वीच्या मार्क्सवर मिळत होता. पण, नीट परीक्षेच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश देण्यासंदर्भात एक अध्यादेश राज्य सरकारने काढला. त्यामुळे राज्यात नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती.
अनिताने आणि इतर काही विद्यार्थ्यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली. हा निर्णय रद्द करावा अशी मागणी अनिताने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
अनिताने १२वीच्या परीक्षेत १२०० पैकी ११७६ स्कोर केला होता. तिला मेडीकलसाठी १९६.७५ आणि इंजिनिअरिंगसाठी १९९.७५ स्कोर केला होता. याच्या आधआरावर तिला मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये इंजिनिअरींगचा कोर्स ऑफर केला होता.
मात्र, या कोर्सला अॅडमिशन घेण्यास तिने नकार दिला. अनिताला नीट परीक्षेत ७०० पैकी ८६ स्कोर केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या एका अध्यादेशामुळे तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते.