Success Story: महिलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या ते काम पूर्ण केल्याशिवाय हार मानत नाहीत. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव कमावले आहे. जगात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी स्वत:च्या हिम्मतीवर करोडोचा व्यवसाय उभा केलाय. आज आपण अशा महिलेबद्दल जाणून घेऊया, जिने 145 कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडली. यानंतर 8300 कोटींची कंपनी उभी केली. अमेरिकी बिझनेस वुमन आणि फिनटेक फर्म स्टॅक्स (Stax) ची को फाऊंडर आणि सीईओ सुनीरा मधानीबद्दल आपण बोलत आहोत. त्या या मुक्कामापर्यंत कशा पोहोचल्या? याबद्दल जाणून घेऊया.
सुनीरा मधानी या मूळच्या पाकिस्तानच्या आहेत. त्यांचे आई-वडिल पाकिस्तानातून अमरिकेला गेले. वडिलांनी अमेरिकेत व्यवसाय सुरु केला. पण काही कारणाने हा व्यवसाय बुडाला. यामुळे घरातील सर्व मंडळींना धक्का बसला. या काळात सुनीरा यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडावरुन फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी पेमेंट प्रोसेसर कंपनी फर्स्ट डेटामध्ये नोकरी सुरु केली. व्यवसाय मालकांना पेमेंट टर्मिनल विकण्याचे त्यांचे काम होते. यावेळी त्यांना नव्या व्यवसायाची आयडीया आली.
सुनीरा मधानी यांनी आपल्या वडिलांना सुचलेल्या व्यवसायाच्या कल्पनेबद्दल सांगितले. यानंतर वडिलांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला. सुनीराने स्वत: काम करावं अशी त्यांची इच्छा होती. सुनिरा यांच्याकडे काम सुरु करण्यासाठी 6 महिन्यांचा पगार होता. 2014 आपला भाऊ रहमतुल्ला याच्यासोबत मिळून त्यांनी स्टॅक्स कंपनीची सुरुवात झाली. येथे पेमेंट प्लॅटफॉर्म पर्सेंटेज ऑफ सेल्स मॉडेलवर काम सुरु केले. दोघांनी मिळून मंथली सब्सक्रिप्शनचा प्लॅटफॉर्म उभा केला. त्यांनी पहिल्यांदा 100 ग्राहक मिळवले. यावेळीच त्यांच्या कंपनीचे स्टॅक्स विकत घेण्यासाठी 145 कोटींची ऑफर आली. पण सुनीरा यांनी ही ऑफर नाकारली.
सुनीरा माधनी यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. आपली कौशल्य पणाला लावली. नवनवे प्रयोग केले. त्यामुळे त्यांना खूप चांगला रिपोर्ट मिळाला. आता यांच्या कंपनीचे मूल्य 1 अब्ज डॉलर्स किंवा 8300 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या आठ वर्षांत, स्टॅक्सने $23 अब्ज रुपयांचे व्यवहार केले आहेत.
व्यवसायाच्या क्षेत्रात महिलांची प्रगती मला पहायची आहे, असे त्या सांगतात. यासाठी त्यांनी सीईओ स्कूल नावाचा एक बचत गटाची स्थापन केली आहे. सुमारे 3 लाख नोकरदार महिला या बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. यासाठी लाईव्ह पॉडकास्टही सुरू करण्यात आले आहे.