AMUL सोबत बिझनेस सुरू करा अन् 10 लाख रुपये महिना कमवा; जाणून घ्या सविस्तर माहिती

आपला व्यवसाय सुरू करून बंपर कमाईच्या संधीच्या शोधात असाल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे

Updated: Aug 22, 2021, 11:23 AM IST
AMUL सोबत बिझनेस सुरू करा अन् 10 लाख रुपये महिना कमवा; जाणून घ्या सविस्तर माहिती title=

Business opportunity: आपला व्यवसाय सुरू करून बंपर कमाईच्या संधीच्या शोधात असाल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूल फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. छोटे गुंतवणूकदार त्यातून बंपर कमाई करू शकतात. अमूलची फ्रेंचाइजी घेणे फायद्याचा सौदा आहे. 

विना रॉयल्टी आणि प्रॉफिट शेअरिंगने मिळणार AMUL Franchise
अमूल रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगची फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. एवढेच नाही तर यासाठी लागणारा खर्च सुद्धा खूप नाही. तुम्ही 2 लाखापासून ते 6 लाखापर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात सुरूवातीपासूनच चांगला प्रॉफिट मिळतो.

किती गुंतवणूक करावी लागेल
AMUL दोन प्रकारच्या फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. जर तुम्हाला अमूल आऊटलेट अमूल रेलवे पार्लर किंवा क्योस्कची फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर, साधारण 2 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रॅंड सिक्योरिटीच्या अंतर्गत 25 हजार रुपये तसेच रिनोवेशनला 1 लाख रुपये इक्विपमेंटवर 75 हजार रुपये खर्च येतो. याची अधिक माहिती तुम्हाला फ्रेंचाइजीच्या पेजवर मिळेल.

दुसरी फ्रेंचाइजीसाठी 6 लाखाची गुंतवणूक
जर तुम्ही अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लर चालवू इच्छिता तर त्या फ्रेंचाइजीसाठी 5-6 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असेल. यामध्ये ब्रॅंड सिक्योरिटीसाठी 50 हजार रुपये, रिनोवेशनसाठी 4 लाख रुपये, इक्विपमेंटसाठी 1.50 लाख रुपयांची आवश्यकता असते. 

किती होणार कमाई
अमूलच्या मते फ्रेंचाइजीच्या माध्यमातून दर महिन्याला साधारण 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते.  यामध्ये मिल्क पाऊच 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्टवर 10 टक्के आणि आइसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.

अमूल आइसक्रीम पार्लरची कमाई
अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचाइजी घेतल्यानंतर रेसिपी बेस्ड आइसक्रीम, शेक, पिज्जा, सॅंडविच, हॉट चॉकलेट, ड्रिंकवर 50 टक्के कमीशन मिळते. तसेच प्री-पॅक आइसक्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रोडक्टवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

कंपनीची फ्रेंचाइजी घेण्याच्या अटी
जर तुम्ही अमूल आऊटलेट घेत असाल तर तुमच्याकडे 150 स्केअरफूट जागा असावी जर इतकी जागा असेल तर अमूल तुम्हाला फ्रेंचाइजी देईल. तसेच आइसक्रीम पार्लर साठी कमीत कमी 300 स्केअरफूट जागा असायला हवी. यापेक्षा कमी जागेत. फ्रेंचाइजी ऑफर नाही करता येत.

अमूल देणार सपोर्ट
अमूलकडून तुम्हाला LED सायनेज दिले जातील. सर्व इक्विपमेंट आणि ब्रॅंडिंगवर सब्सिडी मिळवून दिली जाईल. इनोग्रेशन सपोर्ट दिला जाईल आणि जास्त निगोशिएट केल्यास डिस्कॉंउंट देखील मिळेल ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिले जातील. पार्लर बॉय किंवा मालकाला ट्रेनिंग दिली जाईल. तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहचवण्याची जबाबदारी अमूलची असेल.

कसे करणार अप्लाय
जर तुम्ही फ्रेंचाइजीसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर retail@amul.coop वर मेल करणे गरजेचे असेल. तसेच पूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी  या लिंक वर क्लिक करा.
http://amul.com/m/amul-scooping-parlours