उत्तर प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, ८ ठार ३० जखमी

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये बस पूलावरुन कोसळल्याने आठ ठार तर 30 जण जखमी झालेत. 

Updated: Jun 14, 2017, 11:06 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, ८ ठार ३० जखमी title=

जौनपूर : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये बस पूलावरुन कोसळल्याने आठ ठार तर 30 जण जखमी झालेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस सई नदीच्या पूलावरुन जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पूलाच्या कठड्यावर आदळली आणि कोसळल्याचं सांगण्यात येतंय. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी वाराणसीच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. इतर किरकोळ जखमींवर जौनपूरच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.