राहुल गांधींना 'पप्पू' बोलल्यामुळे काँग्रेस नेता निलंबित

राहुल गांधींचा उल्लेख पप्पू केल्यामुळे मीरतच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाला निलंबित करण्यात आलं आहे.

Updated: Jun 14, 2017, 05:52 PM IST
राहुल गांधींना 'पप्पू' बोलल्यामुळे काँग्रेस नेता निलंबित  title=

मीरत : राहुल गांधींचा उल्लेख पप्पू केल्यामुळे मीरतच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाला निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुल गांधींबाबत हे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

पप्पूनं अडाणी, अंबानी आणि माल्ल्याबरोबर हातमिळवणी केली असती पण त्यानं तसं केलं नाही. पप्पू मंत्री किंवा प्रधानमंत्रीही झाला असता पण हे सगळं नाकारून तो मन्दसौरमध्ये जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवल्याचा आरोप प्रधान यांच्यावर आहे. प्रधान यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रधान म्हणालेत तसंच त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून व्हायरल करण्यात आलेला फोटो फोटोशॉप असल्याचंही प्रधान यांचं म्हणणं आहे.