Video: ...अन् जळणारी कार अचानक धावू लागली! Bike, Car ला धडक; पुढे काय घडलं पाहाच

India Burning Car Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एखादा अपघात झाल्यानंतर होणारी बघ्यांची गर्दी कशाप्रकारे धोकादायक ठरु शकते हे यामधून अधोरेखित होत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2024, 12:34 PM IST
Video: ...अन् जळणारी कार अचानक धावू लागली! Bike, Car ला धडक; पुढे काय घडलं पाहाच title=
हा थरार कॅमेरात कैद झाला

Burning Car Jaipur Video: एखाद्या कारला आग लागली आणि ती कार जळून खाक झाली असं तुम्ही यापूर्वी अनेक बातम्यांमध्ये वाचलं असेल किंवा रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जळणाऱ्या कारची दृष्यही पाहिली असतील. मात्र जयपुरमध्ये शनिवारी एक फारच विचित्र प्रकार पाहायला मिळाला. या अपघातामध्ये चक्क एक जळती कार रस्त्यावर धावत होती. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

नक्की घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुदर्शनपुला पुलियाकडे जाणाऱ्या अजमेर रोडवर हा सारा विचित्र प्रकार घडला. या कारमध्ये चालक नव्हता. ही कार मार्गात येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत पुढे जात होती. अनेकजण स्वत:च्या बाईक मार्गातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते. ही बर्निंग कार अखेर रस्त्याच्या डिव्हायडरला धडक देऊन थांबली. सुदैवाने या विचित्र अपघातामध्ये कोणातीही जिवतहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर जखमी झालं नाही. 

पोलिसांनी काय माहिती दिली?

सोशल मीडियावर या चालकाशिवायच्या जळत्या कारचा रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, जितेंद्र जनगीड नावाची व्यक्ती ही कार चालवत होती. मानसरोवर येथील दिव्य दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जितेंद्र यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि पुढे या कारने पेट घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उतार असल्याने ही कार आग लागल्यानंतरही कारमध्ये चालक नसल्याने धाव होती. कार चालवत असताना जितेंद्र यांना कारच्या एसी व्हेंटमधून धूर येताना दिसला. त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला. त्यांच्या भावाने त्यांना बोनेट उघडून इंजिन तपासण्यास सांगितलं. जितेंद्र यांनी कार थांबवली आणि ते बोनेट उघडून तपासणी करण्याच्या तयारी असतानाच बोनेट उघडताच त्यांना इंजिनला आग लागल्याचं लक्षात आलं. 

एकच धावपळ

जिंतेंद्र काही करण्याच्या आधीच आग पसरली. त्यामुळे हॅण्डब्रेक फेल झाला आणि कार उड्डाणपूलाच्या उताराच्या दिशेने धावू लागली. रस्त्यात उभं राहून जळणारी ही कार पाहणाऱ्या बघ्यांच्या काही बाईक्सला बाईक्सला या कारने धडक दिली. तसेच एका कारलाही ही बर्निंग कार चाटून गेली. मात्र आगीच्या ज्वालांमध्ये जळत असलेली कार रस्त्यावरुन धावत असल्याचं दृष्य पाहण्यासाठी आणि आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. अखेर ही कार एका डिव्हायडरला धकली आणि थांबली. 

अखेर आग विजवली

ही कार रस्त्यावर धावत असतानाच कोणीतरी अग्नीशामदलाला फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. कार डिव्हायडरला धडकून थांबल्यानंतर अग्निशामनदलाने काही मिनिटांमध्ये आग विजवली. आग विजवेपर्यंत ती पूर्णपणे जळून खाक झाली होती.